– हजारो आदीवासी बांधवाची उपस्थिती
The गडविश्व
ता. प्र / सावली, १८ डिसेंबर : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली व विविध आदिवासी संघटनाच्या संयुक्त विद्यमाने बोगस आदिवासीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन धडक मोर्चाचे आयोजन शुक्रवार १७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी आदीवासी संघटनेचे केशव तिराणीक, गुलाब मडावी, जनार्दन गेडाम, अतुल कोडापे, बापुजी मडावी, जितेश कुळमेथे, अशोक उईके, तुकाराम गेडाम, महिपाल मडावी, प्रदीप गेडाम, कुणाल कोवे प्रविण गेडाम, योगिता पेंदाम, लखन मेश्राम, यशवंत ताडाम, क्रिष्णा कन्नाके, एकनाथ कन्नाके, राजु कोडापे, लखन मेश्राम, युवराज उईके, आदी आदिवासी बांधव उपस्थित होते.
मोर्चाची सुरुवात आदिवासी वसतिगृहापासुन करण्यात आली. सदर मोर्चा सावली शहराच्या मुख्य मार्गाने तहसील कचेरीवर नेण्यात आला. मुल, सावली, सिंदेवाही या तालुक्यातील वरठी, धोबी यांनी नामसाधर्म्य फायदा घेत धोबा करून आदीवासींच्या सवलती लाटण्याऱ्या जात चोरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह धोबा जमात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावा. ६ जुन २०१७ नुसार बोगस आदीवासींना सेवेतून बडतर्फ करण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयीन निकालाची त्वरीत अमंलबजावणी करावी, जे अधिकारी जमात निहाय योग्य शहानिशा न करता बोगस जात प्रमाणपत्र प्रदान करतात अशा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हासह सेवेतून निष्कासित करावे. चंद्रपूर जिल्हामधील भुमीहीन लोकांचे संरक्षण करून मोफत शासकीय जमीन देण्यात यावी. आदिवासी समाजातील अतिक्रमीत शेतकऱ्यांना विनाअट तात्काळ जमीनीचे पट्टे देण्यात यावे. संविधानातील ५ व ६ व्या अनुसुचीची अमंलबजावणी करण्यात यावी. गैर आदिवासीनी खोटे जातप्रमाणपत्र सादर करून १२५०० पदे बडकावली आहे. ते पद रद्द करून खऱ्या आदींवासी चा समावेश करण्यात यावा. अशा विविध मागण्या घेऊन तहसीलदार यांच्या मार्फतीने भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, युवा जिल्हा अध्यक्ष अतुल कोडापे, तालुका अध्यक्ष प्रविण गेडाम, यासह गोंडवाना संघटना, बिरसा दल, बिरसा क्रांती, बिरसा ब्रिगेड, आफरोट संघटना इंडियन ट्रायबल वालेंटिअर, जागर,अशा विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Naruto) (The Recruit) (Warhammer) (Bilawal Bhutto on Modi) (Avatar)