मुरूमगाव परिसरातील समस्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

229

The गडविश्व
ता. प्रा / धानोरा, १८ डिसेंबर : तालुक्यातील मुरुमगाव परिसरातील चाळीस गावातील नागरिकांनी १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी मुरूमगाव येथे आठ तास चक्काजाम आंदोलन केले होते. परत १६ डिसेंबरला २०२२ चक्का जाम आंदोलनाचा ईशारा समितीने दिला होता. या चक्काजाम आंदोलनाला मुरुमगाव येथे भाजपा एसटी मोर्चाचे प्रदेश संघटना सरचिटणीस प्रकाश गेडाम, खासदार अशोक नेते यांचे प्रतिनिधी रवी भांडेकर उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांची चाळीस गावातील ग्रामस्थांसोबत बैठक करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत आंदोलकाशी मध्यस्थी केली होती. परंतु याबाबत बैठक बोलाविली नव्हती त्यामुळे परत आंदोलन करण्याचा ईशारा दिला असतानाच मंगळवार १३ डिसेंबर रोजी या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे भाजपा एसटी मोर्चाचे प्रदेश संघटन सरचिटणीस प्रकाश गेडाम, खासदार अशोक नेते यांचे प्रतिनिधी रवी भांडेकर उपस्थित होते. या बैठकीत एकूण ३६ मागण्यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुरूमगाव व परिसरातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी व चर्चा करण्याकरिता दोन तास वेळ दिला. समस्येमध्ये जिल्हास्तरावरच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तर शासन स्तराच्या समस्या शासनाला अवगत करण्यात येईल असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले .यावेळी मुरूमगाव परिसरातील चाळीस गावातील प्रतिनिधी व सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Naruto) (The Recruit) (Warhammer) (Bilawal Bhutto on Modi) (Avatar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here