सिरोंचातील २२ गावात पेटली दारूमुक्तीची मशाल

243

– मॅरेथॉनमध्ये ५५० स्पर्धकांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, १७ डिसेंबर : सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागासह २२ गावात गाव संघटनेच्या सहकार्याने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने दारूमुक्तीची मशाल पेटवून एकूण ५५० स्पर्धकांनी दौड लावली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी, या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने गावोगावी स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. सिरोंचातील तालुक्यातील अतिदुर्गम, दुर्गम भागात वसलेल्या विविध गावात आयोजित मॅरेथॉनची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. एकूण २२ गावात पार पडलेल्या स्पर्धेत एकूण ५५० स्पर्धकांनी सहभाग घेऊन शक्तीप्रदर्शन केले . यात मेडाराम २१, इंदिरानगर २७, पेंटीपाका १७, चिंतारेवला २६, राजीवनगर ३५, नगरम २८, वडदम २१, असरअल्ली ८०, मृदूकृष्णापुर १९, वमदाला १७, जानमपल्ली २५, मद्दीकुंठा २२, रामांजापूर १९, नंदीगाव २३, चिंतलपल्ली ३७, मंडलापूर २५, आदीमुत्तापूर १९, पिरमिडा १२, मररीगुडम २०, जानमपल्ली चेक १९, पेंटीपाका २२, मनीक्यपूर येथील १६ स्पर्धकांचा सहभाग होता.
स्पर्धेच्या निमित्ताने दारू व तंबाखूविरोधी गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी मुक्तीपथ तालुका चमुनी ग्रामस्थांना दारू व खर्राच्या दुष्परिणामबाबत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प घेतला. दरम्यान पार पडलेल्या स्पर्धेत विजय संपादन केलेल्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Naruto) (The Recruit) (Warhammer) (Bilawal Bhutto on Modi) (Avatar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here