विदर्भात रोकडे ज्वेलर्सच्या ऑफरची धूम; १५ नोव्हेंबरपर्यंत संधी

3

विदर्भात रोकडे ज्वेलर्सच्या ऑफरची धूम; १५ नोव्हेंबरपर्यंत संधी
– २२, १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसह डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर भरघोस सूट; ग्राहकांच्या मागणीमुळे मुदतवाढ
The गडविश्व
नागपूर, दि. १३ : रोकडे ज्वेलर्सच्या ‘G.O.A.T.’ (Greatest Of All Time) महा-ऑफरला विदर्भातील ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या या विशेष ऑफरला नागपूरसह गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतून चांगला प्रतिसाद मिळाल्याने कंपनीने ऑफरची मुदत १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.
या महा-ऑफरअंतर्गत २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ४० टक्के, १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ६० टक्के, तर डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्के सूट दिली जात आहे. तसेच जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर १०१ टक्के व्हॅल्यू बेनिफिट देण्यात येत आहे. दागिन्यांचे मेकिंग चार्जेस ५ टक्क्यांपासून सुरू असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
ग्राहकांसाठी या ऑफरमध्ये विशेष पेमेंट सुविधाही उपलब्ध आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदीचे पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त अथवा छुपे शुल्क आकारले जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासोबतच १०० टक्के बीआयएस हॉलमार्क प्रमाणित सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे.
सन १९०२ पासून दागिन्यांच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या रोकडे ज्वेलर्सने शुद्धता, पारदर्शकता आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर विदर्भात आपली ओळख निर्माण केली आहे. नागपूरमधील महाल, लक्ष्मीनगर, इतवारी, हिंगणा रोड, कोराडी आणि विमानतळ परिसरासह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर येथे कंपनीच्या शाखा कार्यरत आहेत. आता गडचिरोली येथेही रोकडे ज्वेलर्सचे नवीन शोरूम सुरू झाले आहे.
विदर्भातील ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करत व्यवस्थापनाने ही महा-ऑफर १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दागिने खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना या विशेष सवलतींचा लाभ घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
रोकडे ज्वेलर्सच्या सर्व शाखांमध्ये ही महा-ऑफर १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार असून, नियम व अटी लागू आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #RokadeJewellers #GOATOffer #GoldJewellery #DiamondJewellery #Gadchiroli #Vidarbha #Nagpur #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here