बोगस बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशके छापील किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास ‘येथे’ करा तक्रार

81

– कृषी विभागाकडून शेतकऱ्यांकरीता तक्रार निवारण कक्षाची स्थापना
The गडविश्व
गडचिरोली, १ जून : बियाणे, खते, कीटकनाशके, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा, बियाणे ,खते छापील किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास जिल्ह्यात बियाणे, खते, कीटकनाशके तक्रार निवारण कक्ष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे तक्रार करावे. तसेच तालुकास्तरावर कृषी विभागाशी संपर्क करावे. तक्रार करण्याकरीता ९४०४५३५४८१ या क्रमांकावर तसेच ०७१३२-२२२५९३, ०७१३२-२२२३१२, टोल फ्री क्र.१८००२३३४०० या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करते वेळेस शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारींचे निवारण होईल. नियंत्रण कक्ष १५ मे ते २५ ऑगस्ट या दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ७.०० या वेळेत सुरु राहील. या दरम्यान शेतकऱ्यांना तक्रारी करता येतील. तसेच बोगस खते बियाणे विक्री होत असल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

 – कोणत्या तक्रारी करता येणार 
बोगस बियाणे, खते, कीटकनाशके, लिंकिंग, ज्यादा दराने विक्री, पक्की बिलाची पावती न देणे.

 – निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय करावे 

परवाना धारक विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे, पक्के बिल घ्यावे, बिलावर दुकानाचे नाव लॉट नंबर खरेदी दाराचे नाव, विक्रीची किंमत, अंतिम मुदत असल्याची खात्री करूनच घ्यावी, पावतीवर शेतकऱ्याची सही व अंगठा तसेच विक्रेत्यांची सही व शिक्का असावा, कच्चे बिल स्वीकारू नये पक्क्या बिलाचा आग्रह करावा हंगाम संपेपर्यंत बिल जपुन ठेवावे, पेरणीसाठी पिशवी फोडताना खालील बाजूने फोडावी व पिशवीला असलेलें tag व लेबल जपून ठेवावा.
काय करू नये- फेरीवाले, विक्रते (घरपोच सेवा देणारे ) यांच्याकडून बी बियाणे, खते व कीटकनाशक यांची खरेदी करू नये, कोणत्याही परिस्थतीत छापील किंमतीपेक्षा अधिक दराने बियाणे, खते खरेदी करू नये, विक्रेते जबरदस्ती करत असल्यास त्वरित ८६९८३८९७७३ या व्हाटसप क्र. वर तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी केले आहे.
(the gadvishva, the gdv, gadchiroli news, Report ‘here’ if bogus seeds, fertilizers or pesticides are being sold at prices higher than the printed price)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here