-काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे खासदार डॉ. नामदेव किरसान यंना साकडे
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २८ : तालुक्यातील रांगी मुख्यालयापासून १८ कि.मी. अंतरावर आहे. गावाच्या परिसरात १८ ते २० गावे असून परिसराला विद्युत पुरवठ्याचा फारच मोठा त्रास आहे. दिवसातुन किमान १५ ते २० वेळा लाईट जात असल्याने याचा त्रास परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे रांगी येथे ११ के.व्हि.विद्युत स्टेशन देण्याची मागणी २७ ऑगस्ट २०२४ खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हा विद्युत अभियंता गडचिरोली यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी हे गाव मोठे असुन परिसर सुद्धा मोठा आहे. शिक्षण आणि व्यापाराचे केंद्र बिंदू असलेल्या या गावात दर बुधवारी आठवडी बाजार भरतो, त्याच सोबत जिल्हा को- ऑपरेटिव्ह बँकेची शाखा असल्याने दररोज कामाकरिता लोकांची ये- जा सुरू असते आणि नेमका कामाच्या वेळी लाईट नसल्याने अनेकांना आल्या पावली परतावे लागते. विद्युत अभावी शेतकरी कामगार लोकांना ताटकळत रहावे लागते. यामुळे शेकडो लोकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
रांगी गावाला ४० वर्षापूर्वी विद्युत पुरवठा केला होता. तेव्हा पासून या परिसरात विजेची थातुर मातुर वायरिंग ची सुधारणा केली जाते. त्यामुळे वीज पुरवठामध्ये नेहमी बिघाड येत असतो. थोडा फार ही वादळ किंवा पाऊस किंवा नाही आला तरी सुद्धा विजेचा लपंडाव सुरू होतो. त्यामुळे अमिर्झा ३३ के व्ही सब स्टेशन यामधून गावात वीज पुरवठा करावे किंवा गावात ११ के. व्ही विद्युत सब स्टेशन ची उभारणी करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन रांगी येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान व जिल्हा विद्युत अभियंता खांडेकर यांना दिली.
निवेदन देताना सोहेल पठाण, साहिल कूमोटी, प्रभाकर हलामी, जावेदअली सय्यद, बिसन पदा, योगेश चंदनखेडे, स्वराज कन्नाके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora)