कुरखेड्यात ढाब्यावर पोलिसांची धाड : अवैध विदेशी दारू जप्त
The गडविश्व
ता.प्र/कुरखेडा, दि. ०२ : कुरखेडा तालुक्यातील मालदुगी गावाजवळील D1 फॅमिली ढाब्यावर अवैध विदेशी दारूविक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच, पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत ढाब्यावर धाड टाकली. ढाबा परिसर व शेजारील शेतात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान Royal Stag ब्रँडची विदेशी बनावटीची दारू मिळून आली. जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे १७,५०० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी ढाबा चालक दादाजी कृष्णाजी नाकतोडे (वय ५२, रा. गोठणगाव, ता. कुरखेडा) यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धाड टाकणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार मच्छिरके, हेड कॉन्स्टेबल शेखलाल मडावी आणि पोलीस कॉन्स्टेबल कोरे यांचा समावेश होता.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रेमचंद मच्छिरके करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews #kurkhedanews #crimenews














