– घटनास्थळावरून एके-४७ आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली
The गडविश्व
मुलुगु, दि.०१ : उद्या २ डिसेंबर पासून नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहास सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच पोलिस आणि नक्षल्यांमध्ये छत्तीसगड-तेलंगण राज्याच्या सीमेवरील तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील जंगल परिसरात मोठी चकमक उडाली. या चकमकीत महिलेसह ७ नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे. घटनास्थळावरून एके-४७ आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
चकमकीनंतर जवानांनी सर्व मृत नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असल्याचीही माहिती आहे. तर परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे कळते. नक्षली मोठी कारवाई करण्याची योजना आखण्याच्या तयारीत होते असे सांगण्यात येत आहे. मृत नक्षल्यांमध्ये मोठ्या पदावरील नक्षल्यांचा समावेश असल्याचे समजते.