– वीजपुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्याची तीव्र मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १७ : रांगी येथील शेतकरी शांताराम बरडे यांनी आपल्या शेतातील वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करण्याची तीव्र मागणी केली आहे. वादळामुळे त्यांच्या शेतातील विद्युत पोल आडवे झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून कृषी पंप बंद असून, शेतीला पाणी देणे अशक्य झाले आहे.
२०२४ मध्ये विद्युत विभागाने ठेकेदारामार्फत थातुरमातुर पद्धतीने बसवलेले ११ पोलपैकी ६ पोल पहिल्याच पावसाळ्यात वादळामुळे झुकले होते. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या वादळात हे पोल कोसळून जमिनीवर आडवे झाले. काही पोल शेजारच्या शेतातही पडले असून, शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजतारा कापून टाकले आहेत.
सध्या शेतीसाठी रोवणीचे दिवस सुरू आहेत. अशा वेळी पाण्याची नितांत गरज असताना, वीज नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी शांताराम बरडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याकडे निवेदन देत, वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, चुकीच्या पद्धतीने पोल उभे केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देत, तातडीने पडलेले पोल उभे करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews
#PowerSupplyIssue #FarmerDemand #ElectricPoleDown #StormDamage #AgricultureCrisis #IrrigationHalted #Dhanoara #RangiVillage #ElectricityDisruption #Mahavitaran
#वीजपुरवठा #शेतकरीआक्रोश #धानोरा #रांगीगाव #कृषीपंपबंद #वादळनुकसान #विद्युतपोलकोसळले #शेतीचीअडचण #मागणीतीव्र #महावितरण