The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ ऑगस्ट : येथील ११३ बटालियन सि.आर.पि.एफ.च्या वतीने न्यु कोर्ट काँलनीत कमांडंट तस्वीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली १ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सीआरपीएफ चे द्वितीय कमान अधिकारी डाँ. आदित्य पुरोहित व बटालियन ११३ सीआएफचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुरुमगाव पोलीस मदत केंद्र, येरकड पोलीस मदत केंद्र, सावरगाव पोलीस मदत केंद्र, कटेझरी पोलीस मदत केंद्र, ग्यारापती पोलीस मदत केंद्र, कारवाफा पोलीस मदत केंद्र, गोडलवाही पोलीस मदत केंद्र या सर्व मिळून एक हजार वृक्ष लागवड करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील नागरिक, कर्मचारी उपस्थित होते.