जपतलाई अनुदानित आश्रम शाळेत नागपंचमी साजरी

227

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ ऑगस्ट : अनुदानित आश्रम शाळा जपतलाई येथे सोमवार २१ ऑगस्ट रोजी शाळेच्या सभागृहात नागाच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून नाग सापाची माहिती देवुन नागपंचमी सण साजरा करण्यात आला.
धानोरा पासुन ९ कि.मी. अंतरावरील जपतलाई येथील अनुदानित आश्रम शाळेत मुख्याध्यापक ताटपल्लिवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपंचमी सण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर शिक्षक उरकुडे उपस्थित होते. अध्यक्षानी सापाबद्ल सविस्तर मार्गदर्शन केले. सासापांपासून मानवाला होणारे फायदे, विषारी व बिनविषारी साप कोणते याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बि.आर.भोयर यांनी केले तर संचालन चिलमवार मँडम. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील कर्मचारी कमलेश राखडे, दंडिकवार, तानाबाई मुंडके, खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here