– विविध चर्चाणा उधाण
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, २२ ऑगस्ट : स्थानिक नगर पंचायतीच्या उपाध्यक्षा जयश्री रासेकर यांनी सोमवार २१ ऑगस्ट रोजी आपल्या उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा नगर पंचायत अध्यक्ष यांच्याकडे दिला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
जयश्री रासेकर या भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. मात्र अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान त्यांनी भाजपशी बंड पुकारून शिवसेना-काँगेसशी हातमिळवणी करत स्वतः उपाध्यक्ष पद प्राप्त केले. पक्षादेश झुंगारून इतर पक्षाला साथ दिल्याने कारवाई करून सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली होती असे कळते. विशेष म्हणजे त्याच्या कार्यकाळाला अद्याप एक वर्ष शिल्लक होता. मात्र त्यांनी राजीनामा खाजगी कारणाने देत असल्याचे नमूद केले आहे मात्र राजीनाम्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी नगरसेवक पदावर त्या कायम राहणार आहेत. त्यांच्या या राजीनाम्याने मात्र शहरात विविध तर्क वितर्कांना उधाण येत आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, kurkheda news, jayshri rasekar kurkheda nagar panchayat)