– प्रवाशांची व्यथा कोण समजुन घेणार ?
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३० ऑगस्ट : गडचिरोली वरून पाऊणे सात वाजता निघालेली गडचिरोली ते सावरगाव बस धानोरा मुरुमगाव रोडवरील जपतलाई गावात प्रेशर चढत नसल्यामुळे गाडी रोडवर उभी करावी लागल्याने प्रवाश्याना मनस्ताप सोसावा लागला. नाहक त्रास सहन करावा लागत असलेल्या प्रवाशांनी आमच्या व्यस्था समजुन घेणार तरी कोण? असा खोचक प्रश्न शासनाला विचारला आहे.
सविस्तर वृत्त असे कि गडचिरोली बस डेपोत भंगार बस असल्याची नेहमी ओरड ऐकायला येते.अनेकदा बस बंद पडणे, छप्पर उडने, पाणी गळणे असे सर्रास प्रकार उघडकीस आलेत. अश्याच भंगार बसचे ताजे उदाहरण मंगळवार २९ ऑगस्ट रोजी गडचिरोली ते सावरगाव एम. एच. ४० एन ८७२१ क्रमांकाची बस ही सकाळी पावणे सात वाजता गडचिरोली डेपो वरून सावरगावला जायला निघाली. परंतू ती गाडी सावरगावला न पोहोचता धानोरा ते मुरूमगाव रोड वरील जपतलाई गावाजवळ प्रेशर चढत नसल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करण्याची नामुष्की ड्राइवर वर आली. याचा नाहक त्रास प्रवाश्याना सोसावा लागत आहे. प्रवासी बस मध्ये ताटकळत बसून दुसऱ्या गाडीची वाट पाहत होते. याच क्रमांकची बस सोमवार ला सुद्धा एअर लॉक झाल्याने धानोरा येथे बंद पडली होती.
एस.टी महामंडळाच्या ठिगळ लावलेल्या बस, बसमध्ये बिघाड असलेल्या गाड्या महामंडळ सोडते तरी कशाला. प्रवाशांना त्रास देण्यासाठी असावे. या बसच्या कथा दररोज ऐकायला मिळतात. नेहमी रस्त्यावर बंद पडतात कधी बस छप्पर निघतात, बस ड्राइवर ला छत्री घेऊन गाडी चालवावे लागतात असे चित्र आत्ता नेहमीच ऐकायला मिळतात आणि प्रवाशांना सवय झाली परंतु एस.टी महामंडळ प्रवाशांच्या जीवाची खेळण्याचा गोरखधंदा थांबेल तरी कधी. प्रवाशांच्या सोयी सुविधा ची अजिबात काळजी नसुन प्रवाश्याच्या जीवाशी खेळणे सुरु आहे. एस टी महामंडळ ने प्रवाश्याच्या जीवाशी खेळणे बंद करावे अन्यथा प्रवासी व नागरिक एस टी महामंडळ च्या विरुद्धत रस्त्यावर उतरेल अशी वेळ एस टी महामंडळ नी येऊ देऊ नये. प्रवाश्याना चांगले बसेस उपलब्ध करून सेवा द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.