– दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी केले सादरीकरण
The गडविश्व
गडचिरोली, १९ जानेवारी : भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हेमलकसा येथे मुक्तीपथतर्फे क्लस्टरस्तरीय प्रश्नमंजुषा व विचार कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या दोन शाळांची निवड तालुकास्तरावर करण्यात आली.
सदर उपक्रमात जिल्हा परिषद शाळा हेमलकसा, जि. प उच्च प्राथमिक शाळा आरेवाडा, जिल्हा परिषद शाळा कोठी, जिल्हा परिषद शाळाकियर असे एकूण ४ शाळांनी सहभाग घेतला. दरम्यान तुमचा शाळेत काही विद्यार्थी,कर्मचारी तंबाखू खर्राचे व्यसन करत असल्यास त्यांना त्यापासून कसे दूर करणार? काय पद्धती वापरणार, कोणती कृती करणार या विषयावर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी उत्तम असे सादरीकरण केले. या स्पर्धेत अधिक गुण प्राप्त केलेल्या जि. प शाळा आरेवाडा व जि. प शाळा कियर या दोन शाळांची निवड तालुका पातळी करीता करण्यात आली.
सदर कार्यशाळेत प्रश्नमंजुषा व सादरीकरण करीता पर्यवेक्षक म्हणून हेमलकसा वॉर्ड संघटन महिला अध्यक्ष वंदना सडमेक व भामरागड इलाका पट्टीचे सदस्य चिनु महाका यांनी भूमिका पार पाडली. यशस्वीतेसाठी हेमलकसाचे मुख्याध्यापक मारोती वाचामी, कोडपे , नागेश सर यांनी सहकार्य केले. या उपक्रमात चारही शाळांचे १२ विद्यार्थी व ६ शिक्षक सहभागी झाले होते. या स्तुत्य उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम लक्षात आले. सोबतच इतरांना दारू व तंबाखूचे व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कोणते उपाययोजना करता येईल, यासंदर्भात माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Tejasvi Surya) (Crystal Palace vs Man United) (Wolves vs Liverpool) (SBI PO Prelims Result) (JEE Main 2023 Admit Card) (Rohit Sharma) (Milan vs Inter) (MS Dhoni) (Shubman Gill) (Cricket)