The गडविश्व
अहेरी, १९ जानेवारी : जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार पुन्हा एकदा एका अपघातग्रस्ताच्या मदतीला धावून आले असून आर्थिक मदत केली.
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील शुभम निमलवार हा युवक १० जानेवारी रोजी पोलीस भरतीला गडचिरोली येथे गेला असता परत अलापल्ली परततांना मुलचेरा पासून ५ कि.मी अंतरावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. या या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला त्वरित चंद्रपूर येथील मेहरा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. रोजच्या उपचाराकरिता १५ ते २० हजार रूपये खर्च येत असल्याने व घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने त्यांची आर्थिक मदतीची गरज लक्षात घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी ही माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिली असता त्यानी निमलवार कुटूंबाची हालाखीची परिस्थिती पाहून क्षणांचाही विलंब न करता शुभम निमलवार याच्या उपचारार्थ आर्थिक मदत केली व समोर कोणतीही मदत लागत असल्यास निसंकोच आपण मदत करू असे सांगितले.
