धानोरा : रेंगागाव येथे अज्ञात व्यक्तीने जाळले धानाचे पुजने

844

The गडविश्व
ता.प्र /धानोरा, २३ डिसेंबर : तालुक्यातील मुरूमगाव जवळ असलेल्या रेंगागांव येथील बाबुराव देवसिंग पुडो यांच्या शेतातिल धानाचे पुजने अज्ञात व्यक्तिने जाळल्याने सदर व्यक्तिचे मोठे नूकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मेटाकुटिस आला आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रेंगागाव येथील शेतकरी बाबुराव देवसिंग पुडो यांनी स्वतःच्या शेतातील २० एकर जमिनीवरील धानाच्या उत्पादनाची गंजी तयार करुण ठेवली होती. गुरुवार २१ डिसेंबर २०२२ला दुपारी ४.०० वाजता अज्ञात व्यक्ती ने आग लावल्याने सर्व धानाचे ढीग जळून खाक झाले. यामध्ये ६५० भारे होते त्याची अंदाजे १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. आग लावनारा व्यक्ती कोण? या मागचे कारण काय? याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही. महसूल मंडळाचे कर्मचाऱ्यांनी मौक्यावर जाऊन पंचनामा केले आहे तरी संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Dhanora) (Liverpool FC) (Man City vs Liverpool) ( IPL Auction 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here