‘आपली शाळा – आपली जबाबदारी’ : बेडगावच्या माजी विद्यार्थ्यांनी उभारला आदर्श

120

‘आपली शाळा – आपली जबाबदारी’ : बेडगाव माजी विद्यार्थ्यांनी उभारला आदर्श
– मोटारपंप देऊन पाण्याची सोय पुन्हा सुरू
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. १२ : कोरची तालुक्यातील बेडगाव जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात ‘आपली शाळा – आपली जबाबदारी’ या भावनेतून माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आदर्श घालून दिला आहे. शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल तर करण्यात आली होती, मात्र समर सिबल मोटार बसविण्यासाठी निधी उपलब्ध न झाल्याने बोरवेल चालू नसल्याची समस्या गंभीर होत होती. दोन महिन्यांत बोर बुजत असल्याचे निदर्शनास येताच माजी विद्यार्थी पुढे सरसावले.
शाळेची अडचण दूर करण्यासाठी केवळ काही दिवसांत वीस हजार रुपयांची वर्गणी उभारून माजी विद्यार्थ्यांनी समर सिबल मोटारपंप खरेदी करून शाळेकडे सुपूर्द केला. या उपक्रमात न्यायधिश भूषण वाढई, मेजर सुहास मेश्राम, कंत्राटदार जितेंद्र वाळदे, तलाठी सुरेंद्र आंधे, मेजर संतोष ठवरे, मेजर निलेश आंधे यांनी आर्थिक योगदान दिले.
या सहकार्याबद्दल प्राचार्य सी.आर. धारणे, सरपंच चेतन किरसाण, तमूस अध्यक्ष दामू बोगा, राकेश पारडवार, ब्रिजलाल उसेंडी, ज्येष्ठ शिक्षक एस.बी. उसेडी, प्रा. गणेश सोनकलंगी, प्रा. प्रमोद रामटेके, श्रीकृष्णा उईके, प्रा. काजल मडावी, राकेश गायकवाड, विद्या उबरकर, नेहा निमजे, प्रणय लंजे, सौ. जिजा खुणे, शिला नैताम यांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यापूर्वीही गावकऱ्यांच्या एकत्रित सहभागातून शाळेत CCTV कॅमेरे बसविण्यासाठी मदत करण्यात आली होती. शाळेच्या विकासासाठी विविध स्तरातून होत असलेले सहकार्य बेडगाव गावात शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श उपक्रम ठरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Bedgaon #SchoolDevelopment #AlumniSupport #Korchi #Gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here