– ३० नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत येत असलेल्या उपप्रादेशिक कार्यालय धानोरा व आदिवासी विकास सहकारी संस्थामार्फत सन २०२३-२४ खरीप हंगामासाठी धान खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली द्वारे नोंदणी सुरू करण्यात आली असून ३० नोव्हेंबर २०२३ ही ऑनलाईन करण्याची अंतिम मुदत आहे. मागील वर्षी पेक्षा या वर्षी शासनाने ऑनलाईन धान खरेदीसाठी आधार नंबर सोबत मोबाईल नंबर जोडण्याची अट घातली आहे, यात एका अर्जदारास एकच नंबर चा वापर करता येणार आहे. धान खरेदी करिता लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये नोंदणी अर्ज, सातबारा मूळ प्रत, नमुना आठ, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, जातीचा स्वयंघोषणापत्र संमती पत्र, एकापेक्षा जास्त नाव असल्यास बँक खात्यातील नमुना क्रमांक, एक व दोन भरून बँक शाखा व्यवस्थापकाचे सही व शिक्का मारून आणणे अनिवार्य आहे. नोंदणी करिता आधार लिंक असलेला मोबाईल सोबत असणे अनिवार्य, सातबारावर एकापेक्षा जास्त नाव असल्यास त्या सर्वांचे आधार कार्ड ची प्रत त्याच्यावर सही सोबत घेऊन जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. धानोरा तालुक्यामध्ये धानोरा, कारवाफा, चातगाव, पेंढरी,रांगी, मोहली, सोडे, सुरसुंडी, मुरुमगाव, या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.