गडचिरोली : शेतात आलेल्या रानटी हत्तींना पळवून लावतांना हल्ला, शेतकरी ठार

3877

– परिसरात भीतीचे वातावरण
The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : जिल्हा मुख्यालयानजीक असलेल्या दिभना परिसरात रानटी हत्तीच्या कळपाने ठाण मांडले आहे. अशातच आज मंगळावर १७ ऑक्टोबर रोजी रात्रो ९ ते १० वाजताच्या दरम्यान शेतशिवारात आलेल्या हत्तीच्या कळपाला जंगलाच्या दिशेने वळवताना शेतकऱ्यावर रानटी हत्तीने हल्ला करत  सोंडेने उचलून पायाखाली तुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यादरम्यान एकजण कसाबसा आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला आहे. होमाजी गुरनुले असे मृतकाचे नाव आहे.
मागील काही दिवसांपापूर्वी पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता. दरम्यान हा कळप पोर्ला, चुरचुरा, गोगाव मार्ग दिभना, जेप्रा परिसरात आता ठान मांडून आहे. दरम्यान या कळपाने धान शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. आज १७ ऑक्टोबर रोजी रात्रोच्या सुमारास हत्तीचा कळप दिभना परिसरात धान पिकांची नुकसान करत असतांना गुरनुले व आणखी एकजण शेतशिवारात हत्तीच्या कळपाला जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेले. दरम्यान कळपातील एका हत्तीने त्यांच्या दिशेने हल्ला केला. या तावडीत गुरुनुले हे सापडल्याने हत्तीने त्यांना सोंडेने उचलुन जागीच आपटत पायाखाली तुडवून ठार केले. तर सोबतचा एकजण कसाबसा आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाल्याचे कळते. सदर घटनेने मात्र परिसरातील नागरिक भयभीत झाले असून रानटी हत्तीची दहशत पसरली आहे.
आधी वाघाची दहशत आणि आता रानटी हत्तीची दहशत. हत्तीच्या आगमनाने या कळपाजवळ नागरिकांनी जाऊ नये याबाबत वनविभाग वारंवार सूचना देत आहेत. हत्तीच्या कळपावर वनविभागाचे कर्मचारी पाळत ठेवत आहे. सूचना देऊनही काही नागरिक सुचनेकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक दिवसांपासून परिसरात हत्तींचा कळप असल्याने या हत्तींचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी होत आहे. अशातच दिभना येथील शेतकऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात जीव गेल्याने नागरिक वनविभागाप्रती रोष व्यक्त करीत आहे.

(The Gadvishva, The Gdv, Gadchiroli News Updates, Gadchiroli: Farmer killed in attack while driving away wild elephants coming to farm, Dibhna, Gadchiroli Forest, Wils Elephant Attack, Gurnule)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here