– एसीबीआय पेमेंट गेटवेची जोडनी
The गडविश्व
चंद्रपूर, २२ सप्टेंबर : ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे कोर व बफर क्षेत्रात जंगल सफारीसाठी बुकिंग आता www.mytadoba.mahaforest.gov.in या वेबसाईटद्वारे उद्या २३ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. सदर बुकिंग प्रणाली ही महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांनी National Informatics Centre यांच्या माध्यमातून विकसित केली आहे. त्यामुळे आता पर्यटकांना इतर कोणत्याही वेबसाईटचा आधार घ्यावा लागणार नाही.
सदर प्रणाली SBI -e Payment-gateway सोबत जोडण्यात आलेली आहे. तसेच कोअर क्षेत्रात पर्यटनासाठी उपलब्ध कँटर वाहनाची बुकिंग वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल, मुल रोड, चंद्रपूर यांचे कार्यालयात २५ सप्टेंबर २०२३ पासून सकाळी ११ ते २ व दुपारी ३ ते ५ या वेळेस सुरु राहणार आहे. सफारी बुकिंग, वेबसाईट संदर्भात कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक 9579160778 यावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क करावा असे आवाहन वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर डॉ. जितेंद्र रामगावकर (IFS) यांनी केले आहे.
