The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ८ जानेवारी : आदर्श पत्रकार संघ धानोरा तालुक्याची बैठक शुक्रवार ६ जानेवारी ला पत्रकार दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक विश्रामगृह धानोरा येथे पार पडली. त्या बैठकीमध्ये जुन्या कार्यकारणीचा कालावधी समाप्त झाल्याने नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. सदर कार्यकारणी ही एक वर्षासाठी असून कार्यकारणीच्या अध्यक्षपदी समीर कुरेशी, उपाध्यक्षपदी दिवाकर भोयर, सचिव भाविकदास करमणकर, कोषाध्यक्ष शरीफ कुरेशी, प्रसिद्धी प्रमुख
ओम देशमुख, संघटक बंडू हरणे तर सदस्य पदी सिताराम बडोदे, देवराव कुनघाटकर, श्रावण देशपांडे, मारोती भैसारे, अरुण चापडे यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले.
(The Gadvishava) (Gadchiroli News) (IND बनाम SL) (Tottenham vs Portsmouth) (Villarreal vs Real Madrid) (Delhi Mayor Election)(Muktipath)