नागपूर : लग्न कार्यक्रम आटपून परततांना काळाचा घाला, भीषण अपघातात सहा जण ठार

2514

The गडविश्व
नागपूर, दि. १६ : एका लग्नाचा कार्यक्रम आटपून काटोलच्या दिशेने परत जात असतांना सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ट्रक आणि कार च्या झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अजय दशरथ चिखले (वय ४५), विठ्ठल दिगंबर थोटे (वय ४५), सुधाकर रामचंद्र मानकर (वय ४२), रमेश ओंकार हेलोंडे (वय ४८), मयूर मोरेश्वर इंगळे (वय २६), वैभव साहेबराव चिखले (वय ३२) असे अपघातातील मृतकाचे नाव आहेत.
एका क्वॉलीस कारमधून सात जण नागपूरहून लग्न कार्यक्रम आटोपून रात्रो उशिरा काटोलच्या दिशेने प्रवास करत होते.परंतु रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. नागपूरहून काटोलच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या एका ट्रकने क्वॉलीस गाडीला जबर धडक दिली. या अपघातात क्वॉलीस गाडीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात क्वॉलीस गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. जखमीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
(the gdv, the gadvishva, nagpur, gadchiroli, accident, katol )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here