पुराडाचे वन परिक्षेत्र अधिकारी बालाजी डिघोळे सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित

182

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.१७ : Voice of Indigenous People for Justice and Peace या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या वतीने १६ डिसेंबर रोजी गडचिरोली प्रेस क्लब येथे संविधान आणि मानव अधिकार प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमात प्रशाकीय व वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, डॉक्टर्स वर्गाचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुराडाचे (प्रा)वन परिक्षेत्र अधिकारी बालाजी डिघोळे यांना प्रशासकिय तथा पर्यावरण व जंगल संरक्षणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी सामाजिक न्याय पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. एस. के. गजभिये अध्यक्ष आंतरराष्ट्रीय VIPJP, ॲड. किशोर कांबळे सरचिटणीस राष्ट्रीय VIPJP, डॉ. नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे अध्यक्ष विदर्भ VIPJP, सोनल भडके विभागीय वन अधिकारी गडचिरोली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here