MPSC च्या गट क वर्गातील 900 जागांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस तूर्तास स्थगिती

172

The गडविश्व
मुंबई : MPSC च्या गट क वर्गातील 900 जागांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस तूर्तास स्थगित देण्यात आली आहे.
MPSC च्या गट क वर्गातील 900 जागांची जाहिरात शासनातर्फे देण्यात आली होती. त्यासाठी फॉर्म वेबसाईटवर जाऊन भरावे लागणार होते. यापूर्वी देखील या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने मुदतवाढ करण्यात आली होती. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. मात्र आजही वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या.

या प्रकरणी आता दखल घेऊन सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल. ही माहिती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस आणि कमिशनच्या ट्वीटरवरून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here