बोरी येथे नरसिंह भगवान जयंती उत्साहात साजरी

134

बोरी येथे नरसिंह भगवान जयंती उत्साहात साजरी
– आमदार रामदास मसराम यांनी साधला जनतेशी संवाद
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. ३० : कुम्हार समाज, बोरी यांच्या वतीने श्री नरसिंह भगवान जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. कार्यक्रमास आमदार रामदास मसराम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून नागरिकांशी थेट संवाद साधला.
यावेळी बोलताना आमदार मसराम यांनी भगवान नरसिंह यांच्या धर्मरक्षणाच्या कार्याचा उल्लेख करत समाजात ऐक्य, सद्भावना आणि विकासाची भावना जपण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, गावकऱ्यांनी विविध स्थानिक समस्यांबाबत आमदार मसराम यांना निवेदन सादर केले. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हाध्यक्ष (छ.ग.) सुरजित ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, जिल्हा उपाध्यक्ष हकीमउद्दिम शेख, राजेंद्र चकधारी, संतराम चकधारी, किरपाराम चकधारी, झरनसिंग चकधारी, काँग्रेस कार्यकर्ते रवी नंदेश्वर, बोरी सरपंच सावजी बोगा, उपसरपंच मीराबाई काटेंगे, पोलिस पाटील जयश्री दर्रो, प्रवाणशिंग कडयाम, जी. के. खान, मुख्याध्यापक सोमनकर सर, इंदूरकर मॅडम, पंकज निकोडे सर, दीपक नरडंगे, अजमत खान यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here