रक्तदानातून जपली मानवतेची नाळ : कुरखेड्यात ९० जणांचे रक्तदान,आठ महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग
– संत निरंकारी मिशनतर्फे सलग १५ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २० : मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, दिल्ली संलग्न संत निरंकारी मिशन शाखा कुरखेडा यांच्या वतीने शुक्रवारी (दि. २०) संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आठ महिलांसह एकूण ९० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेची नाळ अधिक घट्ट केली. विशेष म्हणजे, कुरखेडा शाखेने सलग १५ व्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करून रक्तदानाची सामाजिक परंपरा कायम राखली.
संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी मानवसेवेचा संदेश देताना, प्रतिशोधाच्या भावनेतून रक्त गटारात वाहण्यापेक्षा ते एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगात यावे, असे आवाहन केले होते. त्यांचाच मानवतावादी विचार पुढे नेत संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या शिबिरात महिलांनीही विशेष उत्साह दाखविला. धनश्री मडावी, वैष्णवी प्रधान, ममता पर्वते, लीला खंडाईत, कशीश बजाज, पल्लवी काळे, सृष्टी विवेक निरंकारी आणि अनु पुस्तोडे या आठ महिलांनी रक्तदान करून महिला सक्षमीकरणासोबतच सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशनचे झोनल इन्चार्ज किशन नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे, प्राचार्य डॉ. नरेंद्र आरेकर, शाखाप्रमुख माधवदास निरंकारी, भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक ॲड. उमेश वालदे, गणपत सोनकुसरे, प्रा. डॉ. दशरथ आदे, प्राचार्य सी. एल. डोंगरवार, मधुकर बोबाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजिता वाढीवे, पत्रकार राम लांजेवार, सिराज पठाण, प्रा. विनोद नागपूरकर आणि राकेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नागेश शाहू, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, डॉ. अंकित बोरसरे, रक्त संकलन तंत्रज्ञ अजय ठाकरे, राहुल सिडाम, प्रफुल्ल राऊत, महिला प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे, धम्मप्रिया झाडे, सतीश गिरी, धीरज खेवले, दीक्षा धोंगडे, रीना गणवीर, शरद बांबोळे, जीवन गेडाम, बंडू कुंभारे, ब्रह्मानंद गोरडवार, हिमांशू भुसारी आणि निकेश भालेराव यांनी वैद्यकीय सेवा बजावली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संत निरंकारी मिशनच्या सेवादल स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.













