The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १५ : तालुक्यातील गोठणगाव येथील युवक मयूर देवराव घुगुसकर (२२) हा आपल्या दुचाकी वाहनाने देसाईगंज वडसा वरून परत आपल्या गावी गोठणगाव येथे दुचाकीने येत असताना वडसा – कुरखेडा रोडवरील नांन्ही फाट्याजवळ ट्रॅक्टर अपघातात त्याच्या हाताला पायाला व छातीला गंभीर मार लागून गंभीरित्या जखमी झाल्याने त्याला १२ फेब्रुवारीला प्राथमिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय भरती करण्यात आले होते. कुरखेडा येथून प्राथमिक उपचार करून त्याला ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्याला नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आज शनिवार १५ फेब्रुवारी २०२५ रोजी रोजी उपचार दरम्यान त्या युवकाची दुपारी १२:३० साडेबारा वाजता त्या युवकाची प्राणज्योत मावळली.
मयूर घुगुसकर या युवकाचा अपघात हा शेतातून चिखल करीत परत जाणाऱ्या कॅचबिल लावलेल्या ट्रॅक्टरची विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी समोरा समोर धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २ फेब्रूवारी रोजी दुपारी ५ वाजताच्या सुमारास कुरखेडा-देसाईगंज मार्गावर नान्ही फाट्याजवळ घडली होती. नान्ही परीसरात असलेल्या शेतात चिखलचे काम निपटवत रूपेश बोधनकार, वैरागड असा नाव लिहलेला MH33 V 6585 क्रमांकाचा ट्रॅक्टर देसाईगंजचा दिशेने जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली. यावेळी दुचाकीस्वार मयूर देवराव घुगुसकर (वय २२) रा.गोठणगांव हा युवक गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टरचा लोखंडी कॅचबिलचा मार लागल्याने युवकाचा एक पाय व हात निकामी झाला होता. याला गंभीर अवस्थेत १०८ क्रमांकाचा
रुग्णवाहिकेने प्रथम येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारा करीता ब्रम्हपुरी व नंतर नागपूर येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. मयूर घुगुसकर हा युवक आपल्या वडिलाला मशीन बोरवेलच्या कामात मदत करून कुटुंबात का आर्थिक मदत करत होता. मयुरच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
