– शासनाने जाहिर केले होते एकुण ३८ लाख रूपयांचे बक्षिस
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : टीसीओसी च्या कालावधी मध्ये सिवायपीसी/डी.व्हि.सी.एम., डि.व्हि.सी.एम. व ए.सी.एम./पी.पी.सी.एम. दर्जाचे वरिष्ठ माओवाद्यांनी १४ फेब्रुवारी रोजी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले. यात एका पती – पत्नी जोडप्याचा समावेश आहे.
विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी, (सिवायपीसी/डिव्हीसीएम/उप-कमांडर, कंपनी क्र. 10 ( वय ४० ) रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके, (डिव्हिसीएम, कुतुल दलम, माड डिव्हीजन) (वय ५५) वर्षे, रा. मेडपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली व वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी, (पि.पी.सी.एम./सी-सेक्शन कमांडर, कंपनी क्र. 10 ( वय 36) वर्षे, रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे नाव आहे. त्यांच्यावर शासनाने एकूण ३८ लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 699 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी हा 2004 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2005 पर्यंत काम केला. 2006 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये काम, 2006 मध्ये धानोरा दलममध्ये कमांडर पदावर पदोन्नती होऊन 2007 पर्यंत काम, 2007 मध्ये माड मधील कुतुल एरीयामध्ये वैद्यकिय कामकाजाचे प्रशिक्षण, 2008 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये एसीएम/पीपीसीएम पदावर बदली होऊन 2010 पर्यंत डॉक्टर म्हणून काम, 2010 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये उप-कमांडर (सीवायपीसी) पदावर पदोन्नती होऊन 2012 पर्यंत काम. 2012 मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये कमांडर पदावर काम, 2012 ते 2015 पर्यंत, बटालीयन क्र. 02 मध्ये सीवायपीसी पदावर काम, 2015 ते 2017 पर्यंत, डीके झोन डॉक्टर टिममध्ये सीवायपीसी/डिव्हिसीएम पदावर काम, 2017 ते 2022 पर्यंत, कंपनी क्र. 01 मध्ये सीवायपीसी/कमांडर तसेच सचिव पदावर काम, 2022 पासून आतापर्यंत, कंपनी क्र. 10 मध्ये सीवायपीसी/डिव्हिसीएम/उप-कमांडर पदावर त्याने काम केले.
नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके ही डिसेंबर 1988 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होवून 1991 पर्यंत काम, 1991 मध्ये कोहलीबेडा दलम (उत्तर बस्तर डिव्हीजन (छ.ग.)) मध्ये बदली होऊन 1996 पर्यंत सदस्य पदावर काम, 1996 साली कोहलीबेडा दलममध्ये एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन 2002 पर्यंत काम, मे 2002 मध्ये माड डिव्हीजनमधील कोहकामेट्टा दलममध्ये बदली होऊन 2003 पर्यंत एसीएम पदावर काम, 2003 मध्ये कमांडर पदावर पदोन्नती होऊन कोहकामेट्टा महिला दलम या नवीन दलममध्ये 2005 पर्यंत काम, 2005 पासून 2011 पर्यंत, कुतूल-कोहकामेट्टा एरीया कमिटीमध्ये नवीन सदस्यांना माओवादी चळवळीची माहिती देण्याचे व नक्षल साहित्यांच्या भाषांतराचे काम, 2012 मध्ये कोहकामेट्टा दलममध्ये डिव्हिसीएम पदावर पदोन्नती होऊन 2015 पर्यंत काम, 2015 मध्ये, मोपोस (मोबाईल पॉलीटीकल स्कुल) मध्ये बदली होऊन 2018 पर्यंत काम, 2018 मध्ये, ऊसेवाडा टेलर टिममध्ये बदली होऊन 2025 पर्यंत काम, जानेवारी 2025 पासून कुतूल एरीया कमिटीतील टेलर टिममध्ये बदली होऊन डिव्हिसीएम पदावर आजपावेतो काम केले.
वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी ही 2008 मध्ये गुर्रेकसा गावातील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन 2009 पर्यंत काम, मे 2009 टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ऑक्टोंबर 2009 पर्यंत काम, ऑक्टोंबर 2009 मध्ये कंपनी क्र. 04 मध्ये बदली होऊन सन 2010 पर्यंत काम, जुलै 2010 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन माहे जानेवारी 2012 पर्यंत काम, जानेवारी 2012 मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन काम, मार्च 2012 मध्ये माड डिव्हीजन मधील बटालियन क्र. 02 मध्ये बदली होऊन2015 पर्यंत काम, 2015 मध्ये डिके झोन डॉक्टर टिममध्ये बदली होऊन 2017 पर्यंत काम, 2017 मध्ये डिके झोन टेलर टिममध्ये बदली होऊन सन 2023 पर्यंत सदस्य पदावर काम, डिसेंबर 2023 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन ऑक्टोंबर 2024 पर्यंत काम, ऑक्टोंबर 2024 मध्ये कंपनी क्र. 10 पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सी-सेक्शन उपकमांडर म्हणून आजपावेतो काम केले.
महाराष्ट्र शासनाने विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी याच्यावर 16 लाख, नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके हिच्यावर 16 लाख तर वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन विक्रम सहागु तुलावी याला एकुण 8.5 लाख, नीलाबाई ऊईके हिला एकुण 8.5 लाख, वसंती हिडामी हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
विक्रम तुलावी व त्याची पत्नी वसंती हिडामी यांना एकत्रित अतिरीक्त 1.5 लाख रुपयांसह एकुण 15 लाख रुपये पुनर्वसनाकरीता बक्षीस म्हणून मिळणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी 2022 ते आतापर्यंत एकुण 53 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच 2025 साली आतापर्यंत एकुण 20 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व सत्य प्रकाश, कमांण्डट 191 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.