कुरखेडा : मृत्यूच्या दारातून परतला जीव, पुराच्या लाटेत वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव

2017

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २१ : तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले खवळले आहेत. या पुराच्या तडाख्यात सोनेरांगी गावातील हरिदास बावनथळे (वय ६०) हे इसम वाहून गेल्याने खळबळ उडाली. तब्बल दोन तास चाललेल्या थरारक बचावकार्यानंतर अखेर त्यांचे प्राण वाचले.
मंगळवारी सायंकाळी बावनथळे काही कामानिमित्त कढोली येथे गेले होते. घरी परतताना कढोली नाल्यावरील पुलावरून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पुलावरून पाणी वाहत होते. संतुलन सुटल्याने ते पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. अंगावर शहारे आणणारी ही घटना समाजमाध्यमांवर व्हिडिओच्या माध्यमातून बुधवारी सकाळी व्हायरल झाली.

पुराच्या वेगात तब्बल अर्धा किलोमीटर वाहत गेलेल्या बावनथळे यांनी एका झाडाला पकडून जीव वाचवला. दोन तासांहून अधिक काळ ते पुराच्या वेढ्यात अडकून होते. अखेर गावकऱ्यांनी दोरखंडाच्या साहाय्याने थरारक बचावकार्य हाती घेतले. जीवाची पर्वा न करता नदीकाठी धाव घेतलेल्या गावकऱ्यांच्या शौर्यामुळे बावनथळे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या बचावकार्यात सोनेरांगीचे सरपंच बाबूराव कूमरे, पोलिस पाटील रूपेश नारनवरे, मोहन मडावी, अक्षय रणदिवे, राकेश मांदाळे, सोनू दखने यांच्यासह अनेक गावकरी सहभागी झाले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एक मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर नागरिकांना पूरग्रस्त नदी-नाले ओलांडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #KurKheda #Gadchiroli #Flood #Rescue #ViralVideo #VillageHeroes #Sonerangi #FlashFlood #RiverRescue #Survival #कूरखेडा #गडचिरोली #पूर #नाला #थरारकबचाव #गावकऱ्यांचेशौर्य #सोनेरांगी #पूरप्रलय #बचावकार्य #व्हायरलव्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here