गडचिरोली–अहेरी एस.टी. बस गट्टा येथे बंद पडली ; प्रवासी अडचणीत

131

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २१ : गडचिरोली आगाराची एस.टी. महामंडळाची बस २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी गडचिरोलीवरून अहेरीकडे जात असताना गट्टा येथे अचानक बंद पडली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागले. बस बंद पडल्याने प्रवासी तासन्तास रस्त्यावर अडकून पडले व पुढील बसची प्रतिक्षा करत राहिले.
प्रवाश्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, दुर्गम भागात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवी व सक्षम बसेस पाठवण्याऐवजी नादुरुस्त व जुन्या बसेस धाडल्या जात असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.
दरम्यान, पावसामुळे या मार्गावरील रस्ते आधीच चिखलमय व खराब अवस्थेत होते. रस्त्याची रुंदी कमी असल्याने वाहने अडकून बसत होती. अशा परिस्थितीत बस बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले.
स्थानिक नागरिक व प्रवाश्यांनी शासन व एस.टी. प्रशासनाकडे तातडीने योग्य बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. “दररोज या मार्गावर शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी प्रवास करतात. बस बंद पडल्याने शिक्षण, नोकरी व दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम होतो,” अशी नाराजी प्रवाश्यांनी व्यक्त केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here