कुरखेडा : पावसाची जोरदार बॅटिंग, गटाराचे पाणी शिरले घरात

875

– अर्धवट नाली बांधकाम व पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा न झाल्याचा परीणाम
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा ( चेतन गहाने ) दि. १९ : शहरात बुधवारी पावसाची जोरदार बॅटिंग पाहावयास मिळाली. या पावसाने शहरातील अनेक भाग जलमय झालेले पाहावयास मिळाले. मात्र नगरपंचायत प्रशासनाचा वतीने पावसाळ्यापूर्वी व्यवस्थीत उपसा न केल्याने तसेच राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत शहरातील मुख्य मार्गाच्या दुतर्फा बांधकाम करण्यात येत असलेल्या सिमेंट क्रांकीट नाली बांधकाम सुद्धा अर्धवट असल्याने रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याने अनेक घरात शिरकाव करीत मोठे नुकसान केले आहे.
ब्रम्हपूरी ते देवरी हा राष्ट्रीय महामार्ग कुरखेडा शहरातील मुख्य बाजार पेठेतून गेलेला आहे. टप्या-टप्याने या मार्गाचे बांधकाम सुरु असून सध्या रस्त्याच्या दूतर्फा नालीचे बांधकाम प्रगती पथावर आहे. मात्र कंत्राटदाराने नालीचे सलग बांधकाम न करता जिथे जागा मोकळी होती तिथे बांधकाम करीत व जिथे अतिक्रमणाची अडचण होती तिथे बांधकाम थांबविले असल्याने या खंडीत बांधकामामूळे पाण्याची निकासी होत नसल्याने या नालीच्या वाहत्या पाण्याची ठिकठिकाणी अडवणूक होत सदर पाणी नाली बाहेर पडत रस्त्यावरून वाहत आहे. सोबतच हा पाणी रस्त्याचा बाजूला असलेल्या घरात शिरकाव करीत आहे. मूसळधार पावसामूळे रस्त्याचा बाजूला असलेल्या नवनाथ धाबेकर तसेच आम्ही आमच्या आरोग्यासाठी कार्यालयात प्रवेश केल्याने या इमारती जलमय होत येथील साहित्याचे मोठे नूकसान झाले आहे. पाण्याची निकासी होत नसल्याने बाजारपेठेतही ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. हे पाण्याचे डबके वाहते न केल्यास येथे डासांची उत्पती होत गंभीर आरोग्याची समस्या नाकरता येत नाही. यावर्षी जुन्या नाल्यांचा उपसा सुद्धा व्यवस्थीत न झाल्याने ठिकठिकाणी जलभराव ची समस्येचा शहर वासियांना सामना करावा लागत आहे. नगर पंचायत प्रशासनाने याची दखल घेत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी शहर वासीयांकडून करण्यात येत आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #mukhymantri yuva kary prashikshan yojna, kurkhedanews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here