कुरखेडा : लैंगिक शोषण करून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती

398

The गडविश्व
कुरखेडा, २२ ऑगस्ट : अल्पवयीन मुलीशी ओळख करून मैत्री केली व त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. यातून युवकाने तिचे लैंगिक शोषण केले व ती सहा महिन्यांची गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा पोलिस ठाणे हद्दीत २१ ऑगस्टला उघडकीस आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभय दिवाकर पदा (१९) रा. बाजीरावटोला, भाकरोंडी असे आरोपीचे नाव आहे. अभय पदाने आरमोरी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय युवतीशी ओळख करत प्रेमात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भधारणा झाल्यावर पीडित मुलीने लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार दिला असता मुलीने तंटामुक्त समितीकडे धाव घेतली दरम्यान समितीने नोटीस पाठविली असता अभय पदा याने दाद दिली नाही. त्यानंतर पीडितेने मालेवाडा पोलीस ठाणे गाठले तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये अभय पदा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडितेवर सध्या उपचार सुरु असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here