महिला वनरक्षकासह पती एसीबीच्या जाळ्यात

1719

– पाच हजारांची स्विकारली लाच
The गडविश्व
ता.प्र / सावली, १८ एप्रिल : अतिक्रमित वनजमिनीवर रोपवन न करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला वनरक्षकासह तिच्या पतीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडल्याची कारवाई सोमवार १७ एप्रिल रोजी केली.
शारदा कुळमेथे (वनरक्षक उपरी बिट ता.सावली) व पती संजय अंताराम आतला अशी लाचखोर वनरक्षक व पतीचे नाव आहे. सदर कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांनी वनजमिनीवर अतिक्रमण केले होते. या वनजमिनीवर वनविभागाकडून रोपवन न करण्याच्या कामासाठी उपरी बिटातील वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता वनरक्षक शारदा कुळमेथे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच लाचेची रक्कम पतीकडे देण्यास सांगितले. १० हजार रुपयांची मागणी करून ताडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना वनरक्षक कुळमेथे यांच्या पतीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर वनरक्षक शारदा कुळमेथे यांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कार्यवाही राहुल माकणिकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक,  अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, म.पो.अ. पुष्पा कोचाळे हे सर्व ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.

(the gdv) (the gadvishva) (chandrapur news crime news acb trap saoli upri forest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here