अतिदुर्गम जारावडी येथे आरोग्य शिबीर संपन्न

175

The गडविश्व
जारावंडी, १६ डिसेंबर : लोकसमग्रह समाज सेवा संस्था, बल्लारपूर अंतर्गत सचा गडेरीया समुदाय विकास प्रकल्पा अंतर्गत क्राइस्ट हॉस्पिटल, तुकूम, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संत अल्फोसा चर्च जारावंडी येथे फा. थॉमसन पुल्लेशेरी, संचालक, लोकसमग्रह समाज सेवा संस्था, बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनात फ्री आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १४ डिसेंबरला करण्यात आले.
या शिबिराला तज्ञ व मार्गदर्शक म्हणून डॉ.कल्याणी, सिस्टर प्रेमा, एस डी, आनंद डोंगरे, फार्मालीस्ट, ज्योती मिंज क्राइस्ट हॉस्पिटल, चंद्रपूर तर प्रमुख पाहुणे फा.राजटम, संचालक, संत अल्फोसा चर्च जारावंडी, सपना कोडापे, सरपंच, ग्राम पंचायत, जारावंडी, दिलीप दास, ग्राम पंचायत सदस्य, जारावंडी वंदना मोहुर्ले, सामाजीक कार्यकर्ते, जारावंडी, सहसंचालक फा.जोब्बी, जोसेफ दोमाला, प्रकल्प समन्वयक क्राइस्ट हॉस्पिटल, तुकूम, चंद्रपूर, भास्कर ठाकूर, समन्वयक, समुदाय विकास कार्यक्रम लोकसमग्रह संस्था, बल्लारपूर, सुधाकर काम्बडे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात मान्यवरांनी आरोग्य स्वच्छता व सतत होणार पाऊस त्यापासून होणारे आजार व आजार होऊ नये त्या करता घ्यावयाची नये, काळजी, व्यसनाधिनता यावर मार्गदर्शन केले.
या शिबिरा मध्ये बिपी, शुगर, अस्थी रोग, इतर आजार यावर मोफत तपासणी व औषधे देण्यात आली. या शिबिरामध्ये २२४ लोकांनी शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे सूत्रसंचालन व आभार सुधाकर काम्बडे, समाज सेवक यांनी केले तर प्रस्थाविक भास्कर ठाकूर ,समन्यक यांनी मानले. या शिबीर यक्षस्वीते करिता, दिनेश चन्द्रगीरीवार, प्रशांत काम्बडे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Kuldeep Yadav) (Govinda Naam Mera) (Thailand Princess Bajrakitiyabha) (Horoscope)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here