१८ बोरे मोहफुलाचा सडवा नष्ट

154

– देसाईगंज पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, १६ डिसेंबर : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा शेत शिवारात आढळून आलेला १८ बोरे मोहफुलाचा सडवा देसाईगंज पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या नष्ट केला.
कोंढाळा- रवी मार्गावरील शेतशिवारातील नाल्यालगत हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवली असता, नाल्यालगत हातभट्टी व मोहफुलाचा सडवा आढळून आला. घटनास्थळी असलेला ८ हजार ५०० रुपये किंमतीचा १८ बोरे मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करण्यात आले.ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार नागरे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी पोलिस पाटील किरण कुंभलवार, मुक्तीपथ तालुका टीम उपस्थित होते.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Kuldeep Yadav) (Govinda Naam Mera) (Thailand Princess Bajrakitiyabha) (Horoscope) (Muktipath) (18 sacks of Mohfula were destroyed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here