मुरुमगाव येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी

229

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ एप्रिल : तालुक्यातील छत्तीसगड सीमेजवळ असलेले मुरुमगाव येथे हनुमानाचे भाविक भक्त जणांनी हनुमान जयंती उत्साहात साजरी केली.
सर्वप्रथम सकाळी हनुमान मंदिरातील मूर्तीचे विधिवत पूजन करून श्री गुरुदेव भजन मंडळ मुरूमगाव च्या वतीने भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भजनानंतर गोपाल काला करण्यात आला व त्यानंतर गावामध्ये रॅली काढून विविध प्रकारे झाकी दाखविण्यात आली. शेवटी हनुमान मंदिरात सर्व भाविक भक्त जमा होऊन महाप्रसादाचे आस्वाद घेतले. यामध्ये हनुमान सेवा संस्था समितीचे अध्यक्ष गणेश रामचंद्र बैरवार यांनी उपस्थित असलेल्या अनेक विभागातील अधिकारी व कर्मचारी व गावातील समस्त नागरिकांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव प्रसाद जी गवर्णा सरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव, अजमन रावटे माजी सभापती पंचायत समिती धानोरा. प्राध्यापक ओम देशमुख, मिंटू दत्त उत्तम विश्वास, जितेंद्र संगोडीया, महेश सांगोडिया नरेश बैरवार रवी संगोडिया, वसंत कोलियारा, जयराम संगोडिया, गणेश कापगते, ब्रिजलाल सोनी व गावातील महिला मंडळींनी सुद्धा सहकार्य केले तसेच हनुमान मंदिर समिती बाजार चौक मुरूमगाव येथे त्या सर्व सदस्यांनी तसेच हनुमान जी च्या भाविक भक्त जणांनी हनुमानजीचे विधिवत पूजन करून लोकांच्या मनोरंजनासाठी रामचरित्र मानस हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील अनेक भक्तजन व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here