धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत २ ग्रा.पं. भाजपच्या ताब्यात, १ काँग्रेस तर १ अपक्ष

257

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ डिसेंबर : तालुक्यात चार ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात दोन भाजपाच्या ताब्यात, एक काँग्रेस तर एका ग्रामपंचायत वरती अपक्षांचा बोलबाला राहिला आहे.
मिचगाव (बुज) व सावरगाव भाजपा च्या ताब्यात, खुटगाव ग्रा.पं. काँग्रेसच्या तर नवरगाव ग्रामपंचायत अपक्ष च्या ताब्यात आल्या. मिचगाव (बुज ) सरपंच पदी तुळशीदास मारोतराव गेडाम (भाजपा), सावरगाव ग्रामपंचायत सरपंच पदी मोनिका श्यामसिंग पुडो (भाजपा), खुटगाव ग्रामपंचायत सरपंच पदी मोहन गावडे (काँग्रेस) तर नवरगाव ग्रामपंचायत सरपंच पदी रंजना विजय सिडाम (अपक्ष) यांची निवड झाली.
खुटगाव ग्रामपंचायत सरपंच पदी मोहन गावडे
प्रभाग क्रमांक (१) रमेश गावडे, सुनिता पदा, अर्चना बमनवार, प्रभाग क्रमांक (२) मधून प्रल्हाद कोरेटी, तर प्रभाग क्रमांक (३) मधून संजय परसे विजयी झाले आहेत.
नवरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध पार पडली. सरपंच पदी रंजनाबाई सिडाम तर प्रभाग क्रमांक( १) मधून सदस्य म्हणून साईनाथ गेडाम, रोशनी कोकडे, रुपाली कोरचा, प्रभाग क्रमांक (२) मधून रेशमीला मडावी, बिसन हलामी, प्रभाग क्रमांक( ३) मधून कपिल कोवा, लक्ष्मी कोवा हे सर्व सदस्य अविरोध निवडून आले. सावरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी मोनिका विजयी झाल्यात. सदस्य म्हणून प्रभाग क्रमांक (२) मधून कमलेश मडावी, प्रभाग क्रमांक (२) मधून प्रेमसिंग कडयाम, महेश कुंजाम, प्रभाग क्रमांक (३)मधून भालसिंग कटिंगल, भानबत्ति मडावी विजयी झाल्यात. मिचगाव बुज ग्रामपंचायतच्या सरपंच पदी तुळसिदास गेडाम विजयी झाले. प्रभाग क्रमांक (१) मधून प्रतीक्षा नरोटे, निवडणुकीतून विजय झाल्या. या प्रभागातून विजय कोराम, विद्या नरुले हे अगोदरच बिनविरोध निवडून आलेय. प्रभाग क्रमांक (२) मधून उर्मिला पुंगाटे विजयी झाल्याय.तर याच प्रभागातून सुशांत उईके बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक (३) मधून पायल करंगामी, अनिल शेंद्रे विजयी झाले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Grampanchayat Election Result)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here