The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजय सुरजुसे, प्रमुख अतिथी म्हणून एन.बी.मेश्राम, प्रशांत साळवे, प्रशांत तोटावार, रश्मी डोके, रजनी मडावी, अशोक कोल्हटकर, शंकर रत्नागिरी, मोहन देवकत्ते, रेखा कोरेवार, प्रियंका आनंदवार, यामिनी चुधरी, प्रमोद सहारे, शालेय कर्मचारी जैराम कोरेटी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य व विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषण सादर केले. कार्यक्रमाचे संचालन रविंद्र निकोडे वर्ग ८ वी ब ,तर उपस्थितांचे आभार विवेक हलामी वर्ग ८वी ब यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका आनंदवार यांनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.