The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०२ : नगरपंचायतने दुर्लक्ष केलेल्या प्रभाग क्रमांक १२ व १३ येथे रस्त्यांनी जात असताना मुख्य रस्त्या लगत असलेल्या या रस्त्यावर मोठें खड्डे पडले होते. ये-जा करणाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. अनेकदा अपघात सुद्धा झालेत. पण नगरपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांनी कायम याकडे दुर्लक्ष केले.
हा रस्ता मुख्य रोड ला संलग्नित असून या रस्त्याकडे स्थानिक नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले होते. या बाबी स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन यांच्या लक्षात आणुन देवून सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष केले, रस्त्याने कित्येक पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट ला सोडायला जातं होते आपल्या लहान मुलांना आपल्या दुचाकी वाहणावर जपूनच या रस्त्याने जावे लागत होते. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता आणि अनेक लोकांना या खराब रस्त्यामुळे अपघातांचा सामना करावा लागला. तसेच वाहतुकीला या रस्त्याचा मुख्यतः उपयोग होत असतांनाही प्रशासनाचे दुर्लक्ष ही चिंतेची बाब लक्षात घेऊन धानोरा येथील साईबाबा मित्र परिवार तसेच समाजकारणात रस घेणाऱ्या युवकांनी स्वखर्चाने पुढाकार घेऊन श्रमदानातून रस्त्याचे काम केले आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
यावेळी धानोरा येथील समाजसेवक मलिक बुधवानी, महेश चिमुरकर, जमीर कुरेशी, रवी येलसलवार, गणेश कुळमेथे, मुकेश बोडगेवार, अफरोज शेख, गणेश चिमुरकर, चिमा चिंचोलकर, विनेश गावडे, पंकज देविकार, महेश चौधरी, अभिजित राखडे, ऋषभ रडके, अमित मेश्राम, मंगेश नरचुलवार, रोहित लाजूरकर, निलेश मत्ते, शब्बीर शेख, अंशुल नैताम, दीपक परतवार, सुखदेव मातलामी, आदित्य कोटांगले, भूषण भैसारे व मित्रपरिवारातील सर्व सदस्य यांनी श्रमदान केले.