गडचिरोली : जहाल महिला नक्षलीचे आत्मसमर्पण

1210

– ०६ लाख रूपयांचे बक्षिस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : चकमक, जाळपोळ, खून अशा विविध गंभीर गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या जहाल महिला नक्षली संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता (वय ४०) रा. तुर्रेमरका, पो. लाहेरी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने आज २१ ऑगस्ट रोहिबगडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. शासनाने तिच्यावर ०६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
शासनाने २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 672 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आज आत्मसमर्पण केलेली महिला नक्षली संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता ही २००७ मध्ये नैबरेड दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये सदस्य पदावर भरती झाली त्यानंतर २००८ मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजन नारायणपुर (छ.ग) मध्ये बदली होवुन २०१० पर्यंत कार्यरत होती. २०१०मध्ये महासमुंद (छ.ग.) दलममध्ये बदली व त्यानंतर २०१४ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होवुन आजपर्यंत कार्यरत होती.
तिच्यावर ०७ चकमक, १ जाळपोळ, ३ असे गंभीर गुन्हे दाखल होते.
महाराष्ट्र शासनाने संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता हिचेवर ०६ लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन संगिता पुसू पोदाडी ऊर्फ सोनी ऊर्फ सरीता ऊर्फ कविता हिला एकुण ४.५ लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०२२ ते आतापर्यंत एकुण २४ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here