गडचिरोली : आपले सरकार सेवा केंद्र भरतीला ब्रेक, ११७ केंद्रांसाठीची जाहिरात रद्द

25

गडचिरोली : आपले सरकार सेवा केंद्र भरतीला ब्रेक, ११७ केंद्रांसाठीची जाहिरात रद्द
– नव्या शासन शुद्धीपत्रकानुसार सुधारित प्रक्रियेनंतर पुन्हा होणार अर्ज प्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : गडचिरोली जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत आणि २ नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्रांच्या स्थापनेसाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात प्रशासनाने रद्द केली आहे. शासनाने मंजुरी प्रक्रियेत सुधारणा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने ९ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र मंजुरी प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. या सुधारित निर्देशांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी १० जुलै २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
प्रशासनाच्या माहितीनुसार, सुधारित शासन निर्देशांनुसार पुढील संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत प्रतीक्षा करावी आणि पुढील सूचना व जाहिरातीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here