छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर २२ जुलैला : गडचिरोलीत विविध शासकीय सेवा एकाच छताखाली

12

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर २२ जुलैला : गडचिरोलीत विविध शासकीय सेवा एकाच छताखाली
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा अधिक गतिमान आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता गडचिरोली येथील सुमानंद सभागृह, आरमोरी रोड येथे मुख्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या उपक्रमांतर्गत महसूल क्षेत्रीय कार्यालयामार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
या मुख्य शिबिराचा लाभ गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना होणार असून, विविध महसुली सेवा आणि शासकीय योजनांबाबतची कामे तसेच मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नोडल अधिकारी तथा तहसीलदार, गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here