गडचिरोली : उदय धकाते यांच्या पुढाकाराला मुस्लिम बांधवांची साथ, नवरात्रीत मांसविक्री बंद

80

गडचिरोली : उदय धकाते यांच्या पुढाकाराला मुस्लिम बांधवांची साथ, नवरात्रीत मांसविक्री बंद
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मटण व चिकन विक्रीची दुकाने घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाला मुस्लिम बांधवांसह मांसविक्रेत्यांनी स्वेच्छेने सहकार्य दिले आहे. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे गडचिरोलीत हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जात आहे.
गडचिरोली शहरात नवरात्री उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. या काळात धार्मिक भावनांचा आदर राखला जावा आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने मागील वर्षापासून नवरात्रीदरम्यान मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. यंदाही शहरातील मांसविक्रेत्यांनी या निर्णयाला सहमती दर्शविली आहे.

धार्मिक भावनांचा आदर, सामाजिक ऐक्याला बळ

नवरात्री हा मातृशक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. या काळात मांसविक्री बंद ठेवण्याच्या निर्णयातून धार्मिक परंपरांचा आदर राखण्यासोबतच परस्पर सन्मान आणि बंधुभावाची भावना जपली जाते, असे उदय धकाते यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांनी दिलेले स्वेच्छेचे सहकार्य हे गडचिरोलीतील सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नवरात्री उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन धकाते यांनी केले. शहरात कुठेही मांसविक्री सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित भागातील दुर्गा व शारदा उत्सव मंडळांनी दुकानदारांशी संवाद साधून दुकाने बंद ठेवण्यासाठी सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
मांसविक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाला मुस्लिम बांधवांनी दिलेल्या सहकार्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने गडचिरोलीत धार्मिक सलोखा, परस्पर आदर आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश अधोरेखित झाला आहे.
#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #HinduMuslimUnity #CommunalHarmony #ReligiousHarmony #NavratriFestival #SocialUnity #UdayDhakate #PeaceAndBrotherhood #GadchiroliNews #TheGadvishva

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here