माहूरगडच्या रेणुका माता शक्तिपीठातून चोपमध्ये येणार दिव्य ज्योत; उद्या भव्य स्वागत

47

माहूरगडच्या रेणुका माता शक्तिपीठातून चोपमध्ये येणार दिव्य ज्योत; उद्या भव्य स्वागत
– वडसा आणि चोपमध्ये स्वागताची जय्यत तयारी
The गडविश्व
देसाईगंज, दि. १० : नवरात्रोत्सवाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी माहूरगड येथील श्री रेणुका माता शक्तिपीठातून पवित्र दिव्य ज्योत आणण्याचा संकल्प सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, चोपने केला आहे. या दिव्य ज्योतीसाठी मंडळाचे भक्त आज माहूरगडच्या दिशेने रवाना झाले. उद्या (११ ऑक्टोबर) सकाळी वडसा आणि त्यानंतर चोप येथे दिव्य ज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे.
सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ, चोप हे गेल्या ४० वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवानिमित्त मंडळाने माहूरगडच्या रेणुका माता शक्तिपीठातून दिव्य ज्योत आणण्याचा संकल्प केला आहे. या पवित्र कार्यासाठी शुभम नागपूरकर, भाऊराव पालांदुरकर, विनोद डोंगरवार आणि गोविंद बनपूरकर हे भक्त रवाना झाले.
यावेळी शिवम नागपूरकर, विश्वा बावणे, निलेश राऊत, अंगराज महाराज, तिलक गायकवाड, कुंदन बावणे, तुशांत उईके आणि सुनील गेडाम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी दिव्य ज्योत आणण्यासाठी रवाना झालेल्या भक्तांना शुभेच्छा दिल्या.

वडसा आणि चोपमध्ये उद्या दिव्य ज्योतीचे स्वागत

माहूरगड येथून आणण्यात येणारी दिव्य ज्योत उद्या सकाळी ८ वाजता वडसा येथे पोहोचणार आहे. हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ, अरुण राजगिरे यांच्या घराशेजारी दिव्य ज्योतीचे स्वागत करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता चोप येथे दिव्य ज्योतीचे भव्य स्वागत करून गावातून रॅली काढण्यात येणार आहे.
दिव्य ज्योतीच्या आगमनाची ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे चोप येथील नवरात्रोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडणार असून, गावातील भक्तिमय वातावरण अधिक चैतन्यमय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here