गडचिरोली : ५ ला राष्ट्रपतींच्या दौऱ्याने कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट मार्ग रहदारीसाठी राहणार बंद

1613

The गडविश्व
गडचिरोली, २ जुलै : गडचिरोली येथे देशाचे राष्ट्रपती ५ जुलै रोजी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की बुधवार ०५ जुलै २०२३ रोजी महामहीम राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांचा गडचिरोली दौरा नियोजित असल्याने ०५ जुलै रोजी होणान्या दौयाच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट दरम्यानचा मार्ग ०५ जुलै सकाळी ०५.०० वा. ते सायंकाळी ०५.०० वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय टी-पॉईंट येथील खुल्या मैदानात केली असून, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हि.व्हि.आय.पी.) वाहनांची सोय मृदा संवर्धन कार्यालय, या ठिकाणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here