गडचिरोली : मृत जवानांच्या कुटूंबियांना ॲक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

161

– पोलीस अधीक्षक सा. यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन
The गडविश्व
गडचिरोली, ९ मे : बॅक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श ॲक्सिस बँकेने ठेवला आहे. २५ ऑक्टोंबर २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी रविंद्र तुलाराम मडावी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन ॲक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती निलम रविंद्र मडावी व आई नामे सौ. धुरपता तुलाराम मडावी यांना आर्थीक मदत स्वरुपात पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.
यावेळी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. तसेच ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश राजेंद्र वल्लालवार यांचे उपस्थितीत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.

(the gdv, the gadvishva, gondwana university, mla sudhakar adbale)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here