गडचिरोली : ‘त्या’ आरोग्य सेविकेच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची प्रशासनाने घेतली गंभीर दखल

96

गडचिरोली : ‘त्या’ आरोग्य सेविकेच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची प्रशासनाने घेतली गंभीर दखल
– तालुका आरोग्य अधिकारी डॉ. म्हशाखेत्री तात्काळ निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली येथे एका कंत्राटी आरोग्य सेविकेने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणात डॉ. म्हशाखेत्री यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रशासनाने याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचेही निश्चित केले आहे.

निलंबन काळात गोंदियाला मुख्यालय

डॉ. म्हशाखेत्री यांना निलंबन काळात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आपले मुख्यालय निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी या कारवाईची माहिती दिली. या घटनेमुळे गडचिरोलीच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांवरील गैरवर्तनाच्या आरोपांची गंभीर नोंद घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here