दखणे विद्यालयात संस्थापक दिन उत्साहात साजरा

64

दखणे विद्यालयात संस्थापक दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १० : मुरुमगाव येथील स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालयात के.आर. दखणे आदिवासी विकास शिक्षण संस्थेचे माजी संस्था अध्यक्ष स्व. केवळरामजी दखणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थापक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा कमलाबाई दखणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्रजी दखणे, कोषाध्यक्षा करीमा देवानी, सदस्य हरीराम कवाडकर, संदीप्ता लाडे, मंगल उईके, मुख्याध्यापक बाळकृष्ण बोरकर, शितल दखणे, प्रवीण दखणे, विलास चौधरी, रोशनी दखणे, अधीक्षक संजय पोहाणे, वैष्णवी दखणे, दीपकुमार दखणे, रामाधर राणा, रमेश निसार, सुरेश तुलावी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मुख्याध्यापक बाळकृष्ण बोरकर यांनी प्रास्ताविकात बोलताना स्व. केवळरामजी दखणे यांनी आदिवासी बहुल परिसरात शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. ‘त्यांचे जीवन चरित्र शून्यातून विश्व उभारणारे होते,’ असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन घनश्याम चिंचोलकर यांनी तर आभार जयेश अंबादे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here