गडचिरोली : अज्ञाताकडून युवतीची धारदार शस्त्राने हत्या

2056

– परिसरात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै : घरी खाटेवर झोपून असलेल्या एका युवतीवर अज्ञाताने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथे गुरूवार १३ जुलै रोजी मध्यरात्रोच्या सुमारास घडली. सदर घटनेने परिसरात एकचं खळबळ उडाली असुन ओलीता रामया सोयाम (२०) रा. रंगयापल्ली असे मृतक युवतीचे नाव आहे.
सदर घटनेची तक्रार मृतक युवतीच्या भावाने सिरोंचा पोलीस ठाण्यात दाखल केली असुन तक्रारीत म्हटले आहे की, आम्ही घरात झोपून होतो सकाळी उठून बघितले असता ओलीता ही खाटेवर बेशुध्द अवस्थेत आढळून आढळून आली. तसेच तिच्या खाटेखाली रक्त सांडले होते व घराचा मागचा दरवाजा उघडा दिसला दरम्यान मी ओलीता ला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र ती तशीच पडून होती. यावेळी मी आरडा ओरड करून आईला उठविले व घटनेची माहिती गावातील नातलगांना दिली व ओलीताच्या जवळ जावून पाहिले असता ओलीताच्या हनुवटीला खाली गळयावर, मानेवर धारदार शस्त्राचे वार दिसून आले असे तक्रारीत मृतक युवतीच्या भावाने नोंदविले आहे. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व अज्ञात आरोपिवरूध्द गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, murder)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here