गडचिरोली : प्रवासी बसची स्टेअरिंग लॉक झाल्याने बस शिरली थेट शेतात

2298

– सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै: दिसवेंदिवस अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. नुकताच काही दिवसांपुर्वी संमुध्दी मार्गावर खासगी बसचा भिषण अपघात झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशातच गडचिरोली जिल्हयात मानव विभास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बस थेट शेतात शिरल्याची घटन सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या जाफराआद गावाजवळ शुक्रवार १४ जुलै रोजी घडली. बसमध्ये यावेळी विद्यार्थीनी व इतर असे जवळपास २५ प्रवासी बसले होते अशी माहिती असून सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. तर काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असल्याचे कळते.
विद्यार्थींनींच्या प्रवासासाठी अहेरी आगाराला मानव मिशनच्या बसेस उपलब्ध करून् दिल्या आहेत. दरम्यान शुक्रवारी सिरोंचा तालुक्यातील विद्यार्थीनी घेवून बस सिरोंचाच दिशेन निघाली होती. यावेळी बस वेगात असतांना अचानक स्टेअरिंगमध्ये बिघाड निर्माण होवून बसचे स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या धानाच्या बांधीमध्ये शिरली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस पटली होण्यापासून वाचविली.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, sironcha, jafrabad)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here